20 नोव्हेबर 2024

मतदानानंतरच एक्झिट पोल जाहीर करण्याचं कारण काय? ओपनियन पोलपेक्षा नेमकं काय वेगळं?

Created By: राकेश ठाकुर

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता 23 तारखेला नव्या मतमोजणी होईल. तत्पूर्वी सर्व वाहिन्यांवर एक्झिट पोल जाहीर केले जातात. 

एक्झिट पोल हा निवडणूक सर्व्हेक्षण आहे. मतदानानंतर निवडणुकीशी संबंधित प्रश्न मतदारांना विचारले जातात. त्यानुसार एक अहवाल तयार केला जातो. 

ओपनियन पोलमध्येही सर्व्हेक्षण केलं जातं. पण यात सर्वांचा सहभाग असतो. यात मतदार असण्याची अट बंधनकारक नसते. त्यांच्या मतानुसार अंदाज बांधला जातो. 

निवडणुका जाहीर झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करता येत नाहीत. मतदान पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर केला जातो. 

लोक प्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 ए अन्वये मतदान संपल्यानंतर त्याच्या पुढच्या अर्धा तासापर्यंत एक्झिट पोल जाहीर करण्यास बंदी आहे. तसं केल्यास दोन वर्षांचा कारावास, दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.

भारतीय निवडणूक आयोगाने 1998 मध्ये पहिल्यांदाच एक्झिट पोल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. 2010 मध्ये सहा राष्ट्रीय आणि 18 प्रादेशिक पक्षांच्या समर्थनानंतर कलम 126 ए अंतर्गत मतदानादरम्यात एक्झिट पोल जारी करण्यावर बंद घालण्यात आली आहे.

ओपिनियन पोल आणि एक्झिट बोल जारी करताना सर्व्हेक्षण करणाऱ्या संस्थेचे नाव, किती मतदार आणि कोणते प्रश्न विचारले याचा उल्लेख अनिवार्य असतो.