भूकंप आल्यानंतर जीव वाचण्यासाठी सर्वात सेफ जागा कोणती ?
28 March 2025
Created By: atul kamble
म्यानमार आणि थायलंड येथे आज मोठा भूकंप आला त्याचे हादरे भारतालाही बसले
भारतात दिल्ली एनसीआरमध्येही भूकंपाचे हादरे चांगलेच जाणवले
भूकंप आल्यानंतर जीव वाचण्यासाठी सर्वात सेफ जागा कोणती पाहूयात
जर भूकंप येताना तुम्ही बाहेर असाल तर इमारत,झाडे, लाईट खांबापासून दूर उभे राहा
या धोकादायक जागांपासून तुम्ही मोकळ्या जागेत जाऊन उभे राहू शकता.
मोकळ्या जागेवर जाऊन तुम्ही जमीनीवर झोपा आणि हादरे कमी होईपर्यंत तेथेच थांबा
जर भूकंपावेळी तुम्ही घरी आहात तर जमीनीवर झोपावे
तुम्ही घरातील एखाद्या मजबूत टेबल खाली किंवा डेस्क खाली लपू शकता
टेबल खाली किंवा डेस्क खाली लपल्यावर डोक्याला झाकून घ्या
insta सारखी आता WhatsApp स्टेटसवर गाणी शेअर करु शकता