युगांडामध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या
3 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
आफ्रिकेतील युगांडा हे वाइल्डलाइफ, माउंटे गोरिल्ला आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते.
युगांडाच्या चलनाचं नाव शिलिंग आहे. यात UGX कोडचा वापर केला जातो. भारतीय नोटांवर INR लिहिलेलं असतं.
भारताचा एक रुपया युगांडात गेल्यावर 42.24 शिलिंग होतो. भारताच्या 100 रुपयांची काय किंमत ते जाणून घ्या.
भारताचे 100 रुपये युगांडात 4224 शिलिंग होतात. भारत आणि युगांडातील चलनातील फरक यावरून दिसून येईल.
युगांडाचं चलन शिलिंग बँक ऑफ युगांडा नियंत्रित करते. चलनाबाबत येथून गाईडलाईन दिल्या जातात.
युगांडामध्येही भारतीय राहतात. भारतीय विदेश मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, युगांडात 30 हजार भारतीय राहतात.
युगांडातील वाइल्डलाइफ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी भेट देतात.