भारतात आंब्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

4 December 2024

Created By: Atul Kamble

 आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते,भारतात आंब्याचे भरपूर उत्पादन होते

आंब्यात  अनेक पोषकतत्वे असून देवगड हापूस जगभर प्रसिद्ध आहे

 हे फळ चवीला अत्यंत गोड सुमधूर लागते त्याच्या अनेक प्रजाती आहेत

 आंबा पिकणाऱ्या प्रांतानुसार तेथील माती - वातावरणाने त्याला चव प्राप्त होते

उत्तर प्रदेशात आंब्याचे सर्वाधिक उत्पादन होत असते

देशाच्या एकूण उत्पादनापैकी उत्तरप्रदेशात २३ टक्के आंब्याचे उत्पादन होते

उत्तर प्रदेशात लागवडीसाठी भरपूर जमीन असल्याने येथे हे पिक जास्त होते

आंध्रप्रदेशचा क्रमांक दुसरा असून येथे देशाच्या २०.०४ टक्के आंबे पिकतात

टॉप - ५ आंबे उत्पादनात कर्नाटक,बिहार आणि गुजरातचा देखील नंबर लागतो