उन्हाळा सुरु होताच ठिकठिकाणी रसवंती गृह दिसतात. उसाचा रस पिण्यासाठी गर्दी होते.
29 March 2025
Created By : Jitendra Zavar
उसाच्या रसात पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे उसाचा रस आरोग्यदायी असते. त्यात अनेक व्हिटॅमिनसुद्धा असतात.
उसाच्या रसात कार्बोहायड्रेट, नॅचरल शुगर, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नीशियम, आयरन, फॉस्फोरस, झिंक आणि एंटीऑक्सीडेंट हे घटक असतात.
उसाच्या रसात व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन शरीरात एंटीऑक्सीडेंटप्रमाणे काम करते. त्यामुळे इम्यूनिटी वाढते. त्वचेवर ग्लो येतो. तसेच एजिंग प्रोसेस स्लो होते.
उसाच्या रसात व्हिटॅमिन बी 1 होते. हा शरीरात असलेल्या कार्बोहायड्रेटला एनर्जीत बदलतो. तसेच
मज्जासंस्था हेल्दी राहतात.
व्हिटॅमिन बी 2 सुद्धा उसाच्या रसात असते. त्यामुळे शरीरातील पेशींची वाढ होते. डोळ्यांच्या दृष्टीसाठीही ते फायदेशीर आहे.
उसाच्या रसामध्ये असलेले व्हिटॅमिन बी 3 असते. त्यामुळे पचनक्रिया मजबूत करते आणि चयापचय व्यवस्थित ठेवते.
व्हिटॅमिन बी 3 कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच, मेंदूचे कार्य सुधारते आणि तणाव कमी करण्यास मदत होते.
उसाच्या रसात व्हिटॅमिन बी 5 असते. हे हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते. याशिवाय शरीरात स्टॅमिना आणि एनर्जी लेव्हल वाढते.