देशात आयएएस, आयपीएस अन् आयआरएस ही सर्वात कठीण परीक्षा आहे. त्यासाठी लाखो युवक प्रयत्न करत असतात. 

30 March 2025

Created By : Jitendra Zavar

आयएएस, आयपीएस अधिकारी एखाद्या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांना पदावरुन बरखास्त करता येते. त्यासाठी पूर्ण चौकशी केली जाते.

​IAS अधिकारी ज्या सरकारसाठी काम करतात त्या सरकारलाही त्याच्या बरखास्तीचे अधिकार नाही. राज्य सरकार केवळ निलंबन करु शकते.

राज्य सरकारने जर एखाद्या अधिकाऱ्याचे निलंबन केले तर ही माहिती 48 तासांत त्या केडरच्या कंट्रोल अथॉरिटीला पाठवावी लागते. त्यानंतर कार्मिक अन् प्रशिक्षण विभागाचे मंत्री त्याला मान्यता देतात. 

30 दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबन असेल तर राज्य सरकारला केंद्राकडून परवानगी घ्यावी लागते. 

घटनेच्या अनुच्छेद 311(2) नुसार जर एखादा अधिकारी दोषी आढळल्यास त्याची रँक कमी करता येते. त्यानंतर चौकशी करुन त्याला नोकरीवरुन बरखास्त करता येते.

आयएएस अधिकाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचा अधिकारी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनाही नाही. केवळ एका व्यक्तीकडे हा अधिकार आहे. 

IAS, IRS, IPS किंवा IFS पदावरील अधिकाऱ्यांची बरखास्ती केवळ राष्ट्रपतीच करु शकतात. यूपीएससीसुद्धा हा अधिकार नाही.