14 नोव्हेबर 2024
इनलँड तायपन आणि किंग कोब्रा भिडल्यावर काय होणार? कोण जिंकणार?
Created By: राकेश ठाकुर
इनलँड तायपन आणि किंग कोब्रा हे जगातील सर्वात विषारी साप आहेत.
या दोघांचा आमनासामना झाला तर कोण जिंकणार? जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर उत्तर जाणून घ्या.
या दोघांमध्ये इनलँड तायपन सर्वात विषारी साप आहे. त्याचं विष किंग कोब्राच्या तुलनेत 180 पट अधिक तीव्र आहे.
किंग कोब्रा त्याच्या तुलनेत कमी विषारी असला तरी आपल्या विषारी दंशाने हत्तीलाही मृत्यूच्या दारात पाठवू शकतो.
या दोन्ही सापांच्या लांबीचा विचार केला तर तायपन हा 6 फूट लांब असतो. तर किंग कोब्राची लांबी 18 फुटापर्यंत असते.
तायपनच्या तुलनेत किंग कोब्रा आक्रमक आहे. तर तायपन हा साप थोडा घाबरा आणि लाजरा असतो.
जर या दोघांचा आमनासामना झाला तर विजय कोब्राचा होईल. कारण त्याला अशा प्रकारचे विषारी जीव जास्त आवडतात.