विमान प्रवासाचा एकदा तरी आनंद घ्यावा, असे अनेकांना वाटत असते.

30 डिसेंबर 2024

विमान प्रवासात एअर हॉस्टेस प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तयार असतात.

विमानात एअर हॉस्टेस आणि क्रू मेंबरसाठी एक 'सीक्रेट रुम' असतो. 

एअर हॉस्टेस, क्रू मेंबरसाठी हे 'सीक्रेट रुम' का असते, हा प्रश्न तुम्हाला पडला असणार आहे. 

एअर हॉस्टेस अन् क्रू मेंबरला अनेकवेळा 12-14 तास काम करावे लागते. त्यामुळे त्यांना थकवा येतो. 

लांब टप्पाच्या विमानांमध्ये त्यासाठी 'सीक्रेट रुम' बनवला जातो. त्या ठिकाणी हे कर्मचारी आराम करु शकतात. 

'सीक्रेट रुम'मध्ये बेड लावलेला असतो. त्या ठिकाणी कर्मचारी आराम करु शकतात.

'सीक्रेट रुम' विमानात शेवटच्या भागात असतो. त्याची माहिती अनेक प्रवाशांना नसते.