बिस्कीटांमध्ये छिद्र का असतात ? (photo : freepik)
17 November 2023
Created By : Manasi Mande
बहुतांश लोकांना सकाळी चहा-कॉफीसोबत बिस्कीट्स खायला आवडतं.
तुम्ही बहुतांश बिस्कीट्समध्ये छिद्र पाहिली असतील.
पण यामागे काय कारण असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?
बिस्कीटांमधील या छिद्रांना 'डॉकर्स' असं म्हटलं जातं.
ही छिद्रं बिस्कीटांमधून हवा जाण्यासाठी पाडली जातात.
बिस्कीटांमध्ये असलेली ही छिद्र बेकिंगशी निगडीत असतात.
बेकिंग करताना बिस्कीटांमधील छिद्रांमधून हवा सहज पास होते.
जर ती हवा पास झाली नाही तर बेक होताना बिस्कीटांचा आकार बदलतो.
छिद्र नसलेली बिस्कीट बेक करताना फुगू लागतात.
त्यामुळेच हवा बाहेर काढण्यासाठी बिस्कीटांमध्ये छिद्र पाडली जातात.
मासे पाण्यात झोपतात तरी कधी ? i
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा