हॅपी नव्हे मेरी ख्रिसमस असंच का म्हणतात ?

23 December 2024

Created By : Manasi Mande

जगभरात 25 डिसेंबरला ख्रिसमस उत्साहात साजरा केला जातो. पण त्याच्या शुभेच्छा देण्याची पद्धत खास आहे. ( photo : Pixabay)

बहुतांश देशात ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना हॅपी ऐवजी मेरी ख्रिसमस म्हटलं जातं.  पण असं का ?

यामागे अनेक कारण आहेत. एक कारण बिशप जॉन यांच्याशी निगडीत आहे. त्यांनी 1534 मध्ये लंडनचे टॉप मिनिस्टर थॉमस क्रोमवेल यांना पत्र लिहीलं.

त्या पत्रात बिशप यांनी थॉमनसा मेरी ख्रिसमस असं विश केलं, तेव्हापासूनच हा शब्द चर्चेत आला.

अनेक रिपोर्ट्सनुसार, मेरी ख्रिसमस हा केवळ शब्द नव्हे ती एक फीलिंग, भावना आहे.

'हॅपी' हा शब्द माणसाच्या भावना दर्शवतो, तर 'मेरी' या शब्दातून स्वभाव अधोरेखित होतो, असं इतिहासकार सांगतात.

यामुळेच जगभरात शुभेच्छा देण्यासाठी हॅपी ऐवजी मेरी ख्रिसमस शब्द वापरला जातो.