4 डिसेंबर 2024
विमान कधीच सरळ रेषेत का उडत नाही? जाणून घ्या
विमान सरळ रेषेत उडत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते असा अनेकांचा समज आहे. पण तसं अजिबात नाही.
कोणत्याही विमानाला तुम्ही एअर ट्राफिक वेबसाईटवर ट्रॅक कराल तर तुम्हाला विमान कधीच सरळ रेषेत उडताना दिसणार नाही.
विमान सरळ न उडण्याचं एक कारण आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पृथ्वीचा गोल आकार.. चला सोप्या भाषेत समजून घ्या.
पृथ्वीचा आकार गोल आहे. त्यामुळे विमानाला आपल्या रस्त्याने जाताना गोलाकार जावं लागतं. यासाठी सरळ रेषेत उडत नाही.
विमान सरळ रेषेत न उडण्याचं दुसरं कारण म्हणजे ट्राफिक.. अनेकदा एअर ट्राफिकमुळे रूट बदलावा लागतो.
वक्र मार्ग कधीकधी विमानाला अंतर कमी करण्यास मदत करते. तसेच आपत्कालीन लँडिंगला मदत होते.
अनेकदा वाऱ्याच्या बदलामुळे विमान मार्ग बदलते. त्यामुळे सरळ रेषेत उडत नाही.