24 डिसेंबर 2024

सँटा क्लॉज लाल रंगाचे कपडेच का परिधान करतो?

ख्रिसमसमध्ये सँटा क्लॉजचं खास आकर्षण असतं. खासकरून लहान मुलं त्याची आवर्जून वाट पाहात असतात. 

सँटा क्लॉजचं खरं नाव संत निकोलस होतं. त्याचा जन्म तुर्कीच्या मायरा शहरात झाला. तो आधी पादरी होता नंतर बिशप झाला. 

संत निकोलस लाल रंगाचे कपडे परिधान करायचे. येथून सँटा क्लॉजला लाल रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड सुरु झाला.

संत निकोलस हे दयाळू स्वभावासाठी परिचित होते. ते कायम लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे. 

इतिहास तज्ज्ञांच्या मते, ते दुसऱ्या रंगाचे कपडेही परिधान करायचे. पण लाल रंग प्रभावी होता. 

सँटाची सध्याचा प्रतिमा प्रसिद्धीच्या झोतात आणण्यात कोकाकोला जाहिरातीचा हात आहे. 

अनेकांना सँटा आणि येशू ख्रिस्त यांच्यात नातं आहे असं वाटतं. पण तसं अजिबात नाही.