विमानात थर्मामीटर का नेऊ शकत नाही ?
20 March 2025
Created By : Manasi Mande
विमानातून प्रवास करताना काही नियम पाळावे लागतात, जे सर्वांच्या सुरक्षेसाठी असतात.
विमानात काही गोष्टी,वस्तू घेऊन जाण्यावर बंदी असते. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे थर्मामीटर (Thermometer)
विमानात मर्क्युरीचा थर्मामीटर म्हणजे पाऱ्याचा थर्मामीटर नेऊ शकत नाही.
पारा हे हेवी मेटल असतं, जो मनुष्यासाठी विषारी ठरू शकतो.
ते मनुष्याच्या शरीराराठी घातक असतो, विशेषत: नर्व्हस सिस्टीम, किडनी आणि मेंदू यासाठी.
जर थर्मामीटर तुटला आणि पारा बाहेर पडला तर तो हवेत पसरू शकतो, आणि प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतो.
विमानाच्या बंद वातावरणात ती समस्या आणखी गंभीर ठरू शकते.
पारा हा इतर धातूंसह रिॲक्ट होऊ शकतो, विशेषत: ॲल्युमिनिअम.
पाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याने ॲल्युमिनिअम कमकुवत होऊ शकतं, ज्यामुळे विमानाच्या स्ट्रक्चरला धोका पोहोचू शकतं.
गरजेचं असेल तर विमानात तुम्ही डिजीटल थर्मामीटर नेऊ शकता.
IPL मध्ये चिअरलीडर्सना पगार किती मिळतो ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा