लग्नापूर्वी मनगटावर हळकुंडं का बांधतात ? 

03 January 2025

Created By : Manasi Mande

हिंदू धर्मात लग्न लागण्यापूर्वी अनेक विधी असतात, प्रत्येक विधीमागे विशिष्ट, खास कारण असतं.

लग्नापूर्वी वधू-वरांच्या मनगटावर हळकुंड बांधलं जातं, त्याच्यामागे अनेक शुभ आणि पवित्र कारणं आहेत.

हिंदू धर्मात हळद खूप पवित्र मानली जाते, पूजेपासून ते लग्नापर्यंत विविध ठिकाणी हळदीचा वापर होतो.

लग्नापूर्वी वधू-वरांना हळद लावली जाते, त्याचेही महत्व असतं.

 लग्नाच्या 1-2 दिवस आधी वधू-वरांच्या मनगटावर हळकुंड बांधलं जातं.

यामुळे लग्न होणाऱ्या जोडप्याचं नकारात्मक शक्ति आणि वाईट नजरेपासून संरक्षण होतं असं मानलं जातं.

लग्न झाल्यावर,वधू-वर घरी आल्यावर हे हळकुंड सोडवलं जातं.