हॉटेलमधल्या बेडशीट्स पांढऱ्या रंगाच्याच का असतात ?
23 October 2024
Created By : Manasi Mande
कोणत्याही हॉटेलमध्ये रहायला गेलात तर दिसेल की खोलीतील बेडशीटच नव्हे तर उशी, कव्हर , चादर सगळंच पांढऱ्या रंगाचं असतं. ( Photos : Freepik)
पांढऱ्या रंगावर डाग सहज लागू शकतो, त्या लगेच खराबही होतात. तरीही हॉटेलमध्ये पांढरीच बेडशीट का असते याचा विचार केला आहे का ?
हॉटेलमध्ये चादर, उशीचे अभ्रे आणि बेडशीटही बल्कमध्ये ब्लीचने धुतले जाते. ते सहज साफ होते. पण रंगीत चादरींचा रंग जाण्याची भीती असते .
पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक मानला जातो. हॉटेल रूममध्ये आल्यावर गेस्ट्सना शांत आणि आरामदायी वाटावं यासाठी पांढरी बेडशीट वापरली जाते.
पांढरा रंग हा क्लासी मानला जातो, त्यामुळेच रूममध्ये चादर, पांघरूण, उशीचे अभ्रेही पांढरेच वापरले जातात.
रंगीत चादरी या ब्लीचमध्ये साफ करता येत नाहीत पण पांढऱ्या चादरी ब्लीचने धुता येतात. त्यामुळे वासही येत नाही.
पांढऱ्या चादरीवर छोटासा डाग पडला तरी लगेच दिसतो, त्यामुळे आपोआप स्वच्छता, हायजीन राखलं जातं.
वजन कमी करण्यासाठी काय खावे? धक धक गर्लच्या पतीने दिल्या खास टीप्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा