Aadhar Card : लग्नानंतर आधारकार्डवर आडनाव असं झटपट बदलाल
23 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
आधार कार्ड हे देशातील महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. पण महिलांना लग्नानंतर आडनाव बदलण्यासाठी धावाधाव करावी लागते.
तुमच्या आधारकार्डवरही लग्नाआधीचं आडनाव असेल आणि बदलायचं असेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देतो.
आधारकार्डवरील आडनाव बदलण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र हे मॅरीज सर्टिफिकेट आहे. यामुळे लग्न वैध असून आडनाव बदलण्यासाठी अर्ज करू शकता.
जवळच्या आधार केंद्रावर जाऊन फॉर्म भरा. त्यात नाव, आधार नंबर इत्यादी भरा. आवश्यक कागदपत्रं आणि मॅरीज सर्टीफिकेटची झेरॉक्स द्या.
व्हेरिफिकेशनसाठी ओरिजनल कागदपत्रं जवळ ठेवा. यानंतर नवा फोटो आणि फिंगरप्रिंट आणि बायोमेट्रिक घेतलं जाईल. अपडेटसाठी 50 रुपये फी भरावी लागेल. यानंतर UIDAI वेबसाईटवर स्टेटस चेक करू शकता.
ऑनलाईन करताना अधिकृत वेबसाईट MyAadhaar पोर्टलवर जा. आधार नंबर आणि ओटीपी टाकून लॉगिन करा. अपडेट आधार सेक्शनला जा आणि अपडेट ऑप्शन निवडा. त्यानंतर आडनाव आणि आवश्यक माहिती टाका.
आडनाव बदलण्यासाठी गॅजेट, मॅरीज सर्टिफिकेट किंवा इतर कायदेशीर दस्ताऐवज द्या. 50 रुपये फी भरावी लागेल. सबमिट करा आणि एसआरएन सेव्ह करा. अपडेटची स्थिती ट्रॅक करू शकाल.
तुळशीच्या रोपाला हळद मिश्रीत पाणी टाकलं तर काय होतं?