कश्मीराच्या चेहऱ्यात काच घुसल्याने रक्तबंबाळ अन्..,कृष्णाअभिषेकने दिली पत्निच्या अपघाताबाबत मोठी अपडेट

18 November 2024

Created By: Mayuri Sarjerao

 बॉलिवू़ड अभिनेत्री आणि कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाहचा भिषण अपघात झाला

कश्मीराने रक्ताने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत अपघाताची बातमी दिली होती

मात्र, कृष्णाने आता पत्निच्या अपघाताबाबत मोठी अपडेट दिली आहे

कृष्णाने सांगितल्याप्रमाणे कश्मीरा मॉलमध्ये फिरत असताना एका काचेला जोरात धडकली.

तेव्हा हा अपघात झाला असून ती काच फुटून कश्मीराच्या चेहऱ्यात घुसल्याने गंभीर दुखापत झाली आहे

पण आता ती ठिक असून तिच्यावर उपचार सुरु असल्याचे कृष्णाने सांगितले

कश्मीरा कॅलिफॉर्नियाच्या पाम स्प्रिंग्समध्ये आहे. ती एलएमध्ये असती तर तिथे आमचे खूप मित्र तिच्यापर्यंत पोहोचले असते असंही तो म्हणाला

दरम्यान एलए मध्ये असणारे डॉक्टर अनिल तिथे जात असल्याचे कृष्णाने सांगितले

तसेच कश्मीरा सुरक्षित आहे माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे नाहीतर मी नक्कीच तिथे गेलो असतो असही कृष्णा म्हणाला