1 April 2024
Mahesh Pawar
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पदभार स्वीकारला आहे.
सध्या चर्चेत असलेले अरविंद आणि सुनीता केजरीवाल यांची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.
अरविंद केजरीवाल यांनी सुनीतासोबत प्रेमविवाह केल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे.
राजकारणात येण्यापूर्वी केजरीवाल आयआरएस (भारतीय महसूल सेवा) मध्ये होते. अरविंद आणि सुनीता यांची प्रेमकहाणी IRS प्रशिक्षणादरम्यान सुरू झाली.
आपल्या भावी पतीने प्रामाणिक राहून देशसेवेला प्राधान्य द्यावे, असे सुनीता यांचे स्वप्न होते.
प्रशिक्षणादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या धाडसाने आणि नि:पक्षपातीपणाने सुनीताला प्रभावित केले आणि त्यांचे प्रेम फुलले.
आयआरएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अरविंद आणि सुनीता यांची पहिली भेट नागपूरच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये झाली.
भेटीनंतर हळूहळू त्यांची जवळीक वाढत गेली आणि ते रोज तासनतास एकत्र राहू लागले.
रोज एकत्र असूनही अरविंद यांचे अनेक महिने सुनीताला प्रपोज करण्याचे धाडस झाले नाही.
दोघांमध्ये समजूतदारपणा होता. पण, अरविंदला प्रेम व्यक्त करायला जवळपास चार महिने लागले.
एके दिवशी दोघांनी ट्रेनिंग अकादमीच्या बागेमध्ये एकमेकांना प्रपोज केले आणि आयुष्याचे सोबती होण्याचा निर्णय घेतला.