21 March 2024
Mahesh Pawar
दुबईत बांधलेली बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. ही इमारत पाहण्यासाठी लोकांची रांग लागते.
बरेच लोक ही इमारत बाहेरून पाहतात. तिचे सौंदर्य आणि भव्यतेचे कौतुक करतात. तर अनेक लोक तिकीट काढून इमारतीमध्ये जातात.
मात्र, तिकीट काढल्यानंतरही बुर्ज खलिफाच्या वरच्या मजल्यावर जाण्याची कोणालाही परवानगी नाही.
बुर्ज खलिफाच्या वरच्या मजल्यावर अनेक मोठी कॉर्पोरेट कार्यालये आहेत. त्यामुळे त्या कार्यालयांमधील लोकांनाच तेथे जाण्याची परवानगी आहे.
अनेक वेळा सेलिब्रिटींचे शूटही वरच्या मजल्यावर केले जाते. त्यामुळे इतर लोकांना वरच्या मजल्यावर जाण्यापासून रोखले जाते.
बुर्ज खलिफाच्या वरच्या मजल्याशिवाय इतर ठिकाणी कोणीही जाऊ शकते. तिथे जाण्यासाठी त्याला फक्त तिकीट खरेदी करावे लागते.
बुर्ज खलिफाच्या वरच्या मजल्यावर जायचे असेल तर त्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते.
सामान्य पर्यटकांना बुर्ज खलिफाच्या वरच्या मजल्यावर जाण्याची परवानगी मिळत नाही.
परंतु एखाद्या सेलिब्रिटीने त्यासाठी अर्ज केला तर त्यांना तेथे जाण्याची परवानगी मिळते.