12 June 2024
Mahesh Pawar
अभिनेत्री कंगना राणौत लोकसभा निवडणुकीत मंडी येथून जिंकून खासदार झाल्या आहेत.
मोदी सरकारमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग या खाते मंत्री चिराग पासवान यांच्याकडे देण्यात आले आहे.
मंत्रिपद मिळाल्याबद्दल चिराग पासवान यांनी आनंद व्यक्त केला आहे. चिराग यांनी हाजीपूरमधून विजय मिळविला आहे.
चिराग पासवान आणि कंगना राणौत यांची नुकतीच एनडीएच्या बैठकीदरम्यान भेट झाली होती.
चिराग यांनी कंगनाला हाक मारली आणि मग दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
वास्तविक चिराग आणि कंगना यांनी मिले ना मिले हम या चित्रपटामध्ये एकत्र भूमिका केली होती.
कंगनाशिवाय या चित्रपटात सागरिका घाटगे आणि नीरू बाजवा यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.
चित्रपटाच्या कथेत चिराग यांची व्यक्तिरेखा तीन मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची दाखवण्यात आली होती.
चिरागचा हा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर मात्र त्यांनी कधीही बॉलिवूडमध्ये काम केले नाही. ते राजकारणाकडे वळले.
चिराग यांचा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी चिराग-कंगना जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
आजही त्या दोघांना एकत्र पाहून लोक खूश होतात. त्यातील कट्टो गिल्हारी हे गाणे लोकांना खूप आवडले होते.