17 July 2024
Mahesh Pawar
अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत 23 जुलैला देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
या अर्थसंकल्पात सरकार ईव्ही ते एमएसएमई क्षेत्र आणि पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग ६ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
या बजेटसोबत सलग सलग 7 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनतील.
त्यांच्या नावावर हा नवा विक्रम असला तरी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्या मोडू शकणार नाहीत.
माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी भारतीय इतिहासात सर्वाधिक 10 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प आणि अंतरिम अर्थसंकल्प यांचा यात समावेश आहे.
मोरारजी देसाई यांनी 29 फेब्रुवारीला त्यांच्या वाढदिवसाला देशाचा अर्थसंकल्प सादर केल्याचा विक्रम आहे.
भारताच्या इतिहासात इतर कोणत्याही अर्थमंत्र्याने असे केले नाही.