15 MAY 2024
Mahesh Pawar
दिल्लीच्या रस्त्यावर वडा पाव विकणारी एक महिला रातोरात इंटरनेटवर स्टार झाली आहे.
तिच्या गाडीवर वडा पाव खाणाऱ्या लोकांच्या लांबच लांब रांगा आहेत. चंद्रिका गेरा दीक्षित असे तिचे नाव आहे.
वडापाव व्यतिरिक्त चंद्रिका सोशल मीडियावर रील्स बनवते. जे लोकांना खूप आवडत आहेत.
मूळची इंदूरची असणारी चंद्रिका म्हणते की, ती मुंबईच्या वडापावची खरी चव दिल्लीतील लोकांना देत आहे.
चंद्रिका हिचे दुकान हटवण्याचे प्रयत्न काही जणांनी केला. त्यासाठी तिला धमक्याही देण्यात आल्या होत्या.
दिल्लीच्या या वडापाव मुलीने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
वडापाव मुलीचे सौंदर्य पाहून तिच्या चाहत्यांनी 'दे बैठेंगे दिल' अशी प्रतिक्रिया दिलीय.
कधी ती साडी-सूट-सलवारमध्ये तिचे सौंदर्य दाखवते. कधी तिचा ग्लॅमरस स्टाईल सोशल मीडियावर पाहायला मिळतो.
चंद्रिका पूर्वी हल्दीराममध्ये काम करायची. मात्र, मुलाच्या प्रकृतीमुळे तिला नोकरी सोडावी लागली होती.