22 July 2024
Mahesh Pawar
आतापर्यंत आपण बहुतेक प्राण्यांच्या दुधाचा रंग पांढराच पाहिला असेल. पण, असे काही प्राणी आहेत ज्यांच्या दुधाचा रंग वेगळा असतो.
काही प्राणी असे आहेत ज्यांच्या दुधाचे रंग गुलाबी, निळा आणि काही अंशी पिवळा देखील आहे.
परंतु, जगात असा एकमेव प्राणी आहे ज्याच्या दुधाचा रंग काळा आहे. हा प्राणी कोणता हे तुम्हाला माहीत आहे का?
दुधाला संपूर्ण आहार म्हटले जाते. ज्यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन 12, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस असे अनेक महत्त्वाचे घटक असतात.
आता काळे दुध देणारा हा प्राणी कोण ते पाहू. काळ्या गेंड्याची मादी काळे दूध देते.
त्यांना आफ्रिकन ब्लॅक राइनो असे म्हणतात. काळ्या गेंड्याच्या दुधात कमीत कमी मलई असते.
मादी गेंड्याचे दूध पाण्यासारखे असते. त्यात फक्त 0.2 टक्के फॅट असते.