29 February 2024
Mahesh Pawar
भारतामध्ये असे एक गावं आहे जिथे त्या गावाचा स्वतःचा कायदा आहे. या गावात आजतागायत एकही पोलीस आलेला नाही.
या गावातील प्रत्येक निर्णय हा येथील गावकऱ्यांना विचारून एकत्रितपणे घेतला जातो.
गावाबाहेर एक बोर्ड लावण्यात आला आहे ज्यावर पर्यटकांसाठी गावातील सर्व नियम काय आहेत ते स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत.
गावातील वस्तूंना कोणी हात लावल्यास किती दंड आकारला जाईल, हे ही त्यात लिहिले आहे.
एखाद्या पर्यटकाने चुकून कोणत्याही वस्तूला हात लावला तर त्याला 1,000 ते 2,500 रुपये दंड होऊ शकतो.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे असलेले हे गाव आहे मलाना. या गावात अनेक नियम आहेत जे येथे येणाऱ्या पर्यटकांना पाळावेच लागतात.
गावात पर्यटक व्हिडिओ बनवू शकत नाही. प्रवाशांना फक्त छायाचित्रे क्लिक करता येतील.
मलाणामध्ये झाडे-झुडपांची लाकडे जाळण्यास मनाई आहे. वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.
गावाच्या नियमानुसार बाहेरच्या लोकांना स्थानिक भाषा बोलता येत नाही. येथे कनाशी भाषा बोलली जाते.
कोणत्याही दुकानातील वस्तूला तुम्ही हात लावू शकत नाही. जो काही माल लागेल तो सांगावा लागतो आणि पैसे ठेवावे लागतात.
मलाणा गावातील रहिवासी स्वतःला अलेक्झांडरचे वंशज मानतात.