22 February 2024
Mahesh Pawar
मृत्यूची खोटी बातमी पसरविल्यानंतर पूनम पांडे पहिल्यांदाच मीडियासमोर आली.
तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मला प्रसिद्धीची गरज नाही असे ती म्हणाली.
देशभरात आणि जगभरातील लोकांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबद्दल माहिती आहे.
त्याबद्दल अनेक लोक पाहत आहेत, ऐकत आहेत, जाणून घेत आहेत. जीवन ही सुंदर गोष्ट आहे.
माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. मी जे काही केले ते योग्यच आहे.
मी असे केले म्हणून अनेक महिलांचे प्राण वाचले आहेत.
माझ्या एका खोट्या बोलण्याने एखाद्या महिलेचा जीव वाचला तर मी अशा प्रकारे 100 वेळा मरेन.
माझ्यावर एकही केस नाही. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.
बाकी ज्यांना जळायचे आहे त्यांनी जळावे. मला काही हरकत नाही.