21 July 2024
Mahesh Pawar
श्रावण महिना भगवान शंकराचा प्रिय महिना मानला जातो. 4 ऑगस्ट 2024 रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे.
या शुभ दिवसांमध्ये शिवलिंगाची पूजा करणाऱ्यांच्या जीवनातून ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो असे मानले जाते.
या दिवशी राशीनुसार महादेवाची पूजा केल्याने लाभदायक ठरून तुमची संकटे दुर होतील.
मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मध दान करावे.
वृषभ राशीच्या लोकांनी श्रावणात पांढरे वस्त्र, तूप, तेल आणि ज्वारीचे दान करावे.
मिथुन राशीच्या लोकांनी हंगामी फळांचे दान करावे. तसेच, गोमातेस चारा द्यावा.
कर्क राशीचे लोक चांदी, दूध, मोती, तांदूळ आणि साखर दान करू शकतात.
सिंह राशीच्या लोकांनी गूळ आणि मध याचे दान करावे.
कन्या राशीच्या लोकांनी पितळेची भांडी दान करावीत.
तूळ राशीच्या लोकांनी तांदूळ आणि दूध दान करावे.
वृश्चिक राशीच्या लोकांनी सोने, तांबे आणि कुंकू दान करावे.
धनु राशीचे लोक हरभरा डाळ आणि केशरयुक्त दूध दान करावे.
मकर राशीच्या लोकांनी छत्री आणि ब्लँकेट दान करावे.
कुंभ राशीच्या लोकांनी निळे आणि काळे कपडे दान करावे.
मीन राशीच्या लोकांनी अन्नधान्य, डाळी आणि पिवळ्या फुलांचे दान करावे.