19 July 2024
Mahesh Pawar
आयुष्याचे सुखः, दुखः, नफा, तोटा हे भाग आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार हे येतच असतात.
कालचक्रानुसार हे सारे काही घडत असते. आयुष्यात कधी राजाचा रंक होती तर कधी रंकाचा राव होतो.
पण, तुमचा येणारा काळ शुभ असेल याचे संकेत निसर्ग, प्राणी किंवा एखाद्या गोष्टीमधून मिळत असतात. हे संकेत कोणते ते जाणून घेऊ.
ब्रम्ह मुहूर्तावर पहाटे 4.24 ते 5.12 मिनिटांनी डोळे उघडून देवाचे स्मरण होत असेल तर ते यशाचे दरवाजे उघडणारे लक्षण आहे.
विनाकारण मन आनंदी होत असेल. सतत मन प्रसन्न असेल अशावेळी एखादी चांगली बातमी मिळते.
घरासमोर सतत गाय येत असेल. पक्षी किलबिलाट करत असतील किंवा घरासमोर मांजरीने पिल्लाला जन्म दिला तर येणारा काळ बलवान असेल असे मानले जाते.
लहान मुले सतत तुमच्याकडे पाहून हसत असेल, तुमच्या घरी किंवा अंगणात येत असेल तर नवीन जीवन आनंदी जाईल.
अनेक दिवसापासूनचे खर्च आटोक्यात येत असतील. नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडणार असतील तर हे उत्तम धन प्राप्तीचे संकेत आहेत.
पूजा करताना पूजा थाळीत फुले पडणे, चंदन पडणे. घरी पाहुण्यांचे आगमन होणे हे शुभ संकेत आहेत.