20 May 2024

कार किंवा बाईक चालविताना अचानक कुत्रे पाठलाग का करतात? काय आहे शास्त्रीय कारण? 

Mahesh Pawar

कार किंवा बाईक चालविताना अचानक कुत्रे पाठलाग करतात असा अनेक वेळा अनुभव आला असेल.

कार आणि बाईक यांचा पाठलाग करणारे असे कुत्रे नेहमीच आक्रमक झालेले दिसतात. गाडीच्या पाठीमागे ते वेगाने पळतात.

कुत्रा हा प्राणी अतिशय निष्ठावान आणि मानवाला अनुकूल असा प्राणी आहे. 

मग, अचानक ते शत्रूंसारखे तुमच्या मागे किना गाडीवर असतान येऊन का भुंकतात?

कुत्रे गाडीजवळ येऊन भुकण्यामागे गाडीचे टायर कारणीभूत असल्याचे विज्ञान सांगते.

कारच्या टायरमधून येणाऱ्या इतर कुत्र्यांच्या वासामुळे भटकणारे कुत्रे आक्रमक होतात.

भटकी कुत्री रस्त्यावर किंवा पार्किंग जागेत उभ्या असलेल्या वाहनांच्या टायरवर लघवी करतात.

त्या लघवीच्या वासामुळे अन्य कुत्रे त्या वासामुळे आक्रमक होऊन तुमच्या गाडीमागे धावू लागतात.

कधी कधी एखाद्या वाहनामुळे त्यांच्या साथीदारांना इजा होते. अशा वाहनांच्या मागेदेखील हे कुत्रे आक्रमक होऊन धावतात.