22 APRIL 2024
Mahesh Pawar
भारत - पाकिस्तान सीमेवरील तनोट हे गाव जैसलमेरपासून 121 किलोमीटर अंतरावर आहे.
तनोट हे गावं येथील माता मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
1965 मध्ये भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानने डागलेले बॉम्ब या मंदिराच्या परिसरात निकामी झाले होते.
आजही त्या बॉम्बचे अवशेष मंदिरात पाहायला मिळतात. 1965 च्या युद्धातील वीरांच्या शौर्याचे दर्शनही येथील छोटेखानी संग्रहालयात घडते.
माता मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन सीमा सुरक्षा दलाकडे आहे. अगदी मंदिरातील पूजाही जवानच करतात.
मंदिर व्यवस्थापनासाठी कॉन्स्टेबल राजकुमार सरकार यांची पश्चिम बंगालवरून इथे 'पोस्टिंग' करण्यात आली आहे.
मंदिराचे व्यवस्थापन जवानांकडे असणारे देशातील हे कदाचित पहिलेच मंदिर असावे.
सीमेवर शत्रूच्या हल्ल्यापासून ही देवी रक्षण करते, अशी इथल्या नागरिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या देवीला 'युद्ध की देवी' असे म्हटले जाते.