वास्तुशास्राप्रमाणे घरातील काचेचे सामान कुठल्या दिशेला ठेवावे?

3 December 2024

Created By: Atul Kamble

वास्तूशास्रात घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी याची माहिती आहे, यात काचेच्या वस्तूंचाही समावेश आहे

नेहमीच लोक काचेचे सामान कुठेही ठेवतात,मग काचेचे साहित्य नेमके कुठे ठेवावे?

घरातील काचेच्या वस्तू पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे शुभ असते

 घराच्या पूर्वेला सजावटी काचेचे सामान ठेवल्याने शांती,समृद्धी,सकारात्मक ऊर्जा वाढते

उत्तर दिशा धन-समृद्धीचे प्रतिक मानली जाते. या दिशेला काचेचे साहित्य ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. प्रगती होते

घर सजविण्यासाठी वजनी काचेचे सामान असेल तर ते दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवणे चांगले

काचेच्या वस्तू घराच्या दक्षिण दिशेला ठेवू नयेत ?दक्षिण दिशेत काचेच्या वस्तू ठेवल्याने दुर्भाग्याचे कारण बनते

 काचेचे सामान शनिवार सोडून अन्य कोणत्याही दिवशी खरेदी केले जावे