हृदयविकार टाळण्यासाठी वापरा हे तेल, माधुरी दीक्षितच्या पतीने काय सांगितलं ?
25 November 2024
Created By : Manasi Mande
हृदयविकाराने दररोज अनेकांचा मृत्यू होतो.
हृदयाच्या नसांमधील घाण वाढल्याने आणि त्या ब्लॉक झाल्याने हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका वाढतो.
परिस्थिती बिघडल्यास अनेकांचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने मोठे सर्जन आहेत. जेवण बनवण्यासाठी 5 तेलांचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.
आपण सांगितलेल्या तेलाचा वापर करून कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकारापासून वाचता येईल, असा दावा डॉ. नेनेंनी केला आहे.
मोहरीचे तेल हे हृदयविकारापासून वाचण्यासाठी चांगलं मानलं जातं. त्यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅ्टस असतात जे कोलेस्ट्ऱॉल मर्यादेत ठेवण्यास मदत करतात.
तुम्ही शेंगदाणा तेलाचाही वापर करू शकता, ते बॅड कोलेस्ट्रॉल हटवण्याचे काम करतं.
डॉ.नेने यांच्या सांगण्यानुसार, राइस ब्रान तेल हृदयासाठी उत्तम आहे.
तिळाचं तेलही बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं. तसेच नसही रिलॅक्स होतात.
हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलही वापरू शकता.