लग्नाच्या एक आठवडा आधी 'या' चुका बिलकूल करू नका...
22 November 2023
Created By : Manasi Mande
लग्नाचा दिवस हा प्रत्येक तरूणासाठी आणि तरूणीसाठी खास असतो.
पण या दिवशी तरूणी त्यांच्या कपड्यांपासून ते सौंदर्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची खास काळजी घेतात.
तुमचंही लवकरच लग्न होणार असेल तर स्किन केअरशी निगडीत या चुका टाळाव्यात. नाहीतर लूक बिघडू शकतो.
लग्नापूर्वी काही दिवस आधी नवी ब्युटी प्रॉडक्ट्स वापरू नका. साईड इफेक्ट झाल्यास चेहरा खराब होऊ शकतो.
लग्नापूर्वी काही दिवस फेशिअल वॅक्सिंग करू नका. त्याने रॅशेसचा त्रास होऊ शकतो.
लग्नाचा दिवस जवळ आल्यावर कोणताही हेअर कट किंवा हेअर ट्रीटमेंट करू नका.
बऱ्याच वेळेस वधू लग्नाच्या एक-दोन दिवस आधी ब्लीच करते. पण त्याने जळजळ, त्वचा लाल होण्याची समस्या उद्भवू शकते.
मासे पाण्यात झोपतात तरी कधी ? i
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा