रिकाम्या पोटी या भाज्यांचा ज्यूस पिणे फायदेशीर
3 December 2024
Created By : Manasi Mande
चांगल्या आरोग्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल, पौष्टिक आहाराचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यूसचे सेवन करणेही फायदेशीर ठरतं. ( Getty Images)
पण सकाळी फळांचा ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी फळांचा ज्यूस प्यायल्याने त्रास होऊ शकतो.
फळांऐवजी तुम्ही भाज्यांचा ज्यूस पिऊ शकता. तो शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतो.
आयुर्वेद डॉक्टर किरण गुप्ता यांच्या सांगण्यानुसार, कोणताही ग्रीन ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी सूर्योदयानंतर प्यावा.
सकाळच्या कोवळ्या उन्हात ज्यूस प्यायल्याने जास्त फायदा होतो. कोवळ्या उन्हातून व्हिटॅमिन डी देखील मिळतं.
गाजर, बीट, मिक्स व्हेजिटेबल ज्यूस, मुळ्याचा ज्यूस अशा अनेक भाज्यांचा ज्यूस पिणे फायदेशीर असते.
मात्र ज्यांना आरोग्याच्या समस्या असतील त्यांनी तज्ञांचा सल्ला घेऊनच ज्यूसचे सेवन करावे, एखादी ॲलर्जी असेल तर ज्यूसचे सेवन टाळावे.
सचिन, विराट नव्हे… हा आहे जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू !
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा