Dal

प्रेशर कुकरशिवाय डाळ बनवता येते. जुन्या काळात या पद्धतीने डाळ बनवली जात होती.

23 March 2025

डाळ बनवण्यापूर्वी चार ते पाच तास डाळ भिजवत ठेवा. मूंग आणि मसूर डाळसाठी हा उपाय करण्याची गरज नाही.

तूर आणि हरबरा डाळ शिजण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे या डाळी भिजवून बनवल्यास कुकरची गरज लागणार नाही. 

डाळ शिजवण्यासाठी कडाईसारखे भांडे घ्या. त्यात पाच कप पाणी टाका. त्यात भिजलेली डाळ टाका.

भिजलेल्या डाळीत मीठ, एक चमचा तेल आणि हळद टाका. ती शिजवण्यासाठी गॅसवर ठेवा.

डाळ उकळायला लागताच आच कमी करा आणि मंद आचेवर शिजवा. थोड्या वेळाने डाळ शिजली की नाही ते तपासून घ्या.

डाळ शिजली असेल तर गॅस बंद करा आणि आता एका कढईत तूप किंवा तेल फोडणी देण्यासाठी गरम करा. त्यात जिरे, हिंग, सुकी लाल मिरची, चिरलेला टोमॅटो आणि कांदा घालून परतून घ्या.

आता या फोडणीत थोडे पाणी आणि शिजलेली डाळ घाला. तिला उकळी आली म्हणजे कुकरशिवायही तुमची चविष्ट डाळ तयार आहे.