दोन आठवड्यांपर्यंत कोथिंबीर ताजी कशी ठेवायची? फ्रीजशिवायही राहील टवटवीत
8 April 2025
Created By: Swati Vemul
दररोजच्या जेवणात कोथिंबीरची अत्यंत गरज असते
बाजारातून आणलेली कोथिंबीर लगेच खराब होत असेल, ताजी राहत नसेल तर काय करायचं?
कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी अत्यंत सोपा उपाय; फ्रीजशिवायही राहील टवटवीत
कोथिंबीरची देठं अर्ध्यापर्यंत कापा आणि त्याला एका लहान पाण्याच्या ग्लासमध्ये ठेवा
त्यानंतर कोथिंबीरला वरून प्लास्टिकची पिशवी बांधा
किंवा कोथिंबीरभोवती प्लास्टिकची पिशवी गुंडाळून सुतळीने ती बांधा
जेव्हा गरज असेल तेव्हा पिशवी बाजूला करून कोथिंबीर काढून घ्या आणि पुन्हा उरलेली बांधून ठेवा
हीच कोथिंबीर तुम्ही फ्रीजमध्ये किंवा किचनच्या ओट्यावर ठेवू शकता
अशा पद्धतीने कोथिंबीर दोन आठवड्यांपर्यंत ताजी आणि टवटवीत राहील
मलबार हिलमधील एलिव्हेटेड नेचर ट्रेलची बुकिंग कशी कराल? तिकिट किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा