16 नोव्हेबर 2024

गूळ की मध! काय खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?

Created By: राकेश ठाकुर

थंडीच्या महिन्यात गरम पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीरातील उबदारपणा कायम राहतो. मध आणि गूळ हे दोन्ही पदार्थ गरम आहेत. 

मधामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, लोह, फायबर, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक असतात. 

गुळामध्ये प्रथिने, लोह,मॅग्नेशियम, मॅगनीज, झिंक, व्हिटॅमिन सी यासारखे पोषक घटक असतात. 

मध आणि गूळ हे दोन्ही पदार्थ पौष्टीक आहेत. पण काही स्थितीत मध चांगलं ठरतं. 

मध आणि गूळ हे दोन्ही पदार्थ साखरेला पर्याय आहेत. पण गुळात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे मध चांगला पर्याय ठरतो. 

हिवाळ्यात मधाचं सेवन केल्यास घशाचे विकार दूर होण्यास मदत होते. पचनसंस्था सुधारते. तसेच उबदारपणा मिळतो. 

गुळाच्या सेवनाचा अशक्तपणा असलेल्या व्यक्तींना फायदा होतो. कारण त्यात भरपूर प्रमाणात लोह असते.