थंडीत कडधान्यांना मोड कसे आणाल ?
10 December 2024
Created By : Manasi Mande
कडधान्य खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं. मूग, मटकी, इतर कडधान्यांना मोड आणून त्याची उसळ केली जाते. ( Photo : Getty Images)
कडधान्य स्वच्छ धुवून, रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सुती कापडात बांधून मोड आणावेत.
उबदार जागी कडधान्य ठेवल्याने लवकर मोड येतात. मात्र थंडीत लवकर मोड येत नाही, त्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.
कडधान्य गरम पाण्यात भिजवा, त्यामुळे लवकर मोड येतात. पण एकदम गरम नव्हे तर कढत पाणी असावं.
मोड येण्यासाठी कडधान्य उबदार जागी ठेवावीत. वारंवार पाणी बदलावे म्हणजे कडधान्याला वास येत नाही.
कडधान्य सुती कापडात बांधून तुम्ही ते उन्हातही ठेऊ शकता. त्यानंतर एअरटाईट किंवा स्टीलच्या डब्यात ठेवावे.
सचिन, विराट नव्हे… हा आहे जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू ! अख्खी IPL टीम घेऊ शकतो विकत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा