वजन कमी करण्यासाठी काय खावे? धक धक गर्लच्या पतीने दिल्या खास टीप्स
23 October 2024
Created By : Manasi Mande
अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ.श्रीराम नेने प्रसिद्ध हार्ट सर्जन आहेत. हेल्थशी रिलेटेड माहिती ते बरेचदा शेअर करतात.( Photo : Soical Media)
वजन कमी करण्यासाठी कोणत डाएट बेस्ट आहे, हे सांगणारा त्यांचा एक व्हिडीओ समोर आलाय.
डॉ.श्रीराम नेने यांच्या सांगण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी जेवण स्किप करणं गरजेचं नाही. जेवणातून पोषक तत्व मिळतात ना हे पाहणं महत्वाचं.
वजन कमी करण्यासाठी जेवणात फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
जेवताना किती अन्न खातोय, त्या पोर्शनवर लक्ष केंद्रित करा.
जेवढी भूक लागेल त्याच्या 80 टक्के प्रमाणातच जेवावं. हळू-हळू खावं.
जेवणात ब्राऊन राईसचा समावेश करू शकता.
त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं वाटतं. सारखं खाण्याची क्रेव्हिंग होत नाही आणि वजन नियंत्रणात राहतं.
वजन कमी करण्यासाठी रोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणंही गरजेचं आहे.
Katrina Kaif : सून असावी तर अशी ! कतरिनाचा देसी अंदाज पाहून नेटकरी फिदा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा