28 January 2024
Mahesh Pawar
लव मॅरेजसाठी पालकांची समती घेणे एक महाकठीण काम असते.
पण, या काही खास टिप्स आहेत ज्यामुळे तुम्ही पालकांना लव मॅरेजसाठी सहज पटवू शकता.
जोडप्यांच्या मनात भीती असते की त्यांचे पालक लग्नासाठी सहमत देतील की नाही.
अनेकांना पालकांची समजूत काढण्यासाठी अनेक वर्षे लागतात.
प्रत्येक मुलाचे पालकांवर खूप प्रेम असते. पण, अनेक घरांमध्ये अनेक प्रकारच्या संवादाच्या सीमा असतात.
पालक आणि मुलांमध्ये यामुळे दरी निर्माण होते. यासाठी या सीमा तोडून पालकांचे मित्र व्हावे लागेल.
पालकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. जोडीदार आल्यानंतरही हे नाते कायम राहिल याची खात्री करून द्या.
पालकांना कशी सून किंवा जावई हवा याचा अंदाज घ्या.
त्याचवेळी आपला जोडीदार कसा असावा हे त्यांना समजून सांगा.
पालकांपैकी आई किंवा वडील कोणाचा कल तुमच्याकडे आहे ते जाणून घ्या.
त्यांच्याशी जोडीदाराची ओळख करून द्या.
जे तुमच्या पालकांपेक्षा मोठे आहेत आणि ज्यांचा ते आदर करतात अशा नातेवाईकांची साथ घ्या.
जोडीदाराची संपूर्ण कुटुंबाशी ओळख करून द्या. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची संपूर्ण माहिती जोडीदाराला द्यायला विसरू नका.