गिझरच्या 'या' लाईटकडे लक्ष द्या; ती लाईट बंद पडली तर होऊ शकतो स्फोट
3 December 2024
Created By: Mayuri Sarj
erao
तुम्ही आंघोळीच्या गरम पाण्यासाठी गिझर वापरत असाल तर अनेक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
कारण आजकाल गिझरच्या स्फोटच्या अनेक घटना घडत आहेत.
कोणत्या परिस्थितीत गिझर फुटू शकतो आणि अपघात होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी ते पाहुयात
गिझर जास्त वेळ चालू ठेवला तर अधिक गरम होतो त्यामुळे गिझर फुटू शकतो
गिझर खूप वेळ चालू ठेवल्याने त्याच्या बॉयलरवर दाब पडतो आणि त्यामुळे गळतीची समस्या उद्भवून दाब वाढल्यामुळे गिझर फुटू शकतो
बॉयलर लीक झाल्यास किंवा फुटल्यास विजेचा झटका लागू शकतो ज्यामुळे मृत्यूही होऊ शकतो
अनेक गिझरमध्ये स्वयंचलित उष्णता सेन्सर असते ज्यात लाल आणि हिरवे दिवे असतात. जर हा सेन्सर काम करायचा बंद झाला तर गिझरचा स्फोट होऊ शकतो.
गिझर कॉइल जास्त गरम केल्याने शॉर्ट सर्किट होऊ शकतो, ज्यामुळे स्फोट देखील होऊ शकतो
"सेम टू सेम पुतळाच"; डोक्यावर पदर, हिरवा चुडा, नऊवारी साडी, मानसी नाईकचे मनमोहक सौंदर्य
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा