बाळाला दृष्ट लागू नये, म्हणून काही उपाय केले जातात. तसेच नजर लागून नये यासाठी लोक अनेक उपाय करतात.
23 March 2025
प्रेमानंद महाराज यांनी एका प्रवचनात सांगितले की, माझ्याकडे अनेक लोक येतात अन् सांगतात आमच्या घराला कोणी नजर लावली आहे.
प्रेमानंद महाराज म्हणतात, कोणता बाहेरचा व्यक्ती काही करु शकत नाही. ही सर्व आपल्या मनाची धारणा आहे. आपल्या डोक्याची रचना आहे.
प्रेमानंद महाराज यांनी या समस्यापासून सुटका करुन घेण्यासाठी एक उपाय सांगितला. त्यामुळे घरात सुख-शांती लाभेल.
प्रेमानंद महाराज यांनी सांगितले रोज आपल्या घरात एक तास भगवद्गीतेचा पाठ आवश्य केला पाहिजे.
भागवत पाठ केल्यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होतो. घरात सुख-शांती लाभेल.
प्रेमानंद महाराज यांनी राधा नावाचे कीर्तन करण्याचा सल्ला दिला. यामुळे केवळ आत्मिक शांती मिळणार नाही तर वाईट नजरही लागणार नाही.
भागवत आणि कीर्तन केल्यानंतर घरात आरती करा. दीपक लावा. त्यानंतर संपूर्ण घरात सकारात्मक उर्जा निर्माण होईल, असे प्रेमानंद महाराज म्हणतात.
प्रेमानंद महाराज यांच्यानुसार हा उपाय सतत दोन महिने केला पाहिजे. त्यानंतर घरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.
हे ही वाचा... व्हिटॅमिन B 12 वाढवण्यासाठी सकाळी खा हे ड्रॉयफ्रूट