थंडीत काकडी खावी की नाही ?

29 November 2024

Created By : Manasi Mande

काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, के, फायबर , पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. ( Photo: Getty Images)

काकडीमध्ये पोषक तत्वं मुबलक असतात. थंडीतही तुम्ही काकडी खाऊ शकता. त्याचे फायदे जाणून घ्या.

काकडीमध्ये भरपूर पाणी असतं. त्यामुळे थंडीत त्वचा कोरडी होत नाही. शरीर हायड्रेटेड राहतं.

काकडीत फायबर असल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाचा त्रास कमी होतो.

काकडीमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट हे इम्युन सिस्टीम मजबूत करतात.

काकडीतील व्हिटॅमिन के आणि कॅल्शिअममुळे हाडं मजूबत होतात.

काकडी थंड प्रकृतीची असते त्यामुळे सर्दी-खोकला, गळा खराब असताना काकडी खाऊ नये.