आला पावसाळा तब्येत सांभाळा, डेंग्यूच्या डासांना असे पळवा

 8 July 2024

Created By: Atul Kamble

पावसाळ्यात उष्णतेपासून सुटका होते परंतू बॅक्टेरियल इंफेक्शनचा प्रादुर्भाव वाढतो

गॅस्ट्रो,डेंग्यू,मलेरिया,टायफॉईड,एन्फ्लूएंजा आणि लेप्टोस्पायरोसिसचा धोका असतो

डेंग्यू एडिस इजिप्ती नावाच्या डासाने होतो.या आजारास चिकनगुनिया देखील म्हणतात

अचानक 102 पर्यंतचा ताप येतो,प्रचंड सांधे दुखी होते,डोळे आणि डोकेदुखी सुरु होते.  

संक्रमित डास चावल्यानंतर आजार साधारणपणे 4 ते 8 दिवसांनी सुरु होतो

 अंग झाकतील असे कपडे घालून झोपावे त्यामुळे रात्रीचे डास चावणार नाहीत.

आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवावी, विटामिन्स सी आणि भाज्या खाव्यात

घरात अडगळ करु नये, पाणी साचून राहील अशा जागा कोरड्या कराव्यात

घराच्या कोपऱ्यात किटकनाशक फवारा, Mosquito Repellent वापरा