फ्रीजमध्ये 'हे' पदार्थ ठेवणं धोकादायक (photo : freepik)

20 November 2023

Created By : Manasi Mande

कोणताही पदार्थ, भाज्या किंवा सामान आणलं की फ्रीजमध्ये ठेवायची बऱ्याच लोकांना सवय असते.

पण हीच सवय भारी पडू शकते. काही पदार्थ असे असतात, जे फ्रीजमध्ये न ठेवणंच योग्य ठरतं.

मध हा बाहेरच, वर्षानुवर्षं चांगला टिकू शकतो. त्याला फ्रीजची गरज नाही.

बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव बिघडू शकते. ते कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका.

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, केळं फ्रीजमध्ये ठेवल्यावर लवकर खराब होतं आणि ते काळंही पडतं.

कांदा चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका. तो कुजून, दुर्गंध येऊ शकतो.

लसून फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याला अंकुर फुटू शकतात. ते कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका.