तोंड आल्यावर करा हे घरगुती उपाय, मिळेल आराम

09 January 2024

Created By : Manasi Mande

तोंड येणं किंवा अल्सर येणं यामुळे लोकांना बराच त्रास सहन करावा लागतो.

सतत वेदना होतात, खाणं तर सोडाच पाणी पिणंही होतं मुश्किल

अशावेळी काही घरगुती उपायांनी मिळेल आराम

जेष्ठमधाच्या पावडरीत मध मिसळून ते मिश्रण लावा, लवकर आराम मिळेल.

५-६ लवंगा भाजून रुमालात बांधा आणि त्याने तोंड शेका. वेदना कमी होतील.

तोंड आल्यावर तिथे हलक्या हाताने नारळाचं कोमट तेल लावणं उपयुक्त.

झोपण्यापूर्वी कोरफडीचा रस आणि आवळ्याची पेस्ट कापसावर लावून रात्रभर तोंडात ठेवा. सकाळी आराम मिळेल.