सर्वात वाईट भावनिक स्थिती कोणती आहे?
29 November 2023
Created By : Mahesh Pawar
भावना उफाळून येतात, भावना रडायला लावतात, भावना आत्महत्येस प्रवृत्त करतात.
भावना उग्र रूप धारण करून कधी कधी वासनेत बदलतात.
भावना आनंद निर्माण करेल तरीसुद्धा हसता हसता अत्यानंदाने ह्रदय विकाराचा झटका येऊ शकतो.
भावनेतून माणूस ईश्वरापर्यत पोचला नाहीतर ईश्वरी कल्पनाच मुळ धरू शकली नसती.
भावना शुन्य माणूस हा राक्षस नाही तर रोबोट झाला असता त्यामुळे भावना हेच माणसाचे वैशिष्ट्य आहे.
मातृत्व, प्रेम, दुःख, क्रोध, मत्सर, द्वेष अशा अनेक प्रकारात भावना मोडतात.
चांगलं ते घ्यावं आणि वाईट ते सोडून द्यावे.
क्रोध सुद्धा काही वेळेस फायदेशीर ठरतो. त्यामुळेच कुठली भावना वाईट ते सांगता येणार नाही.
कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा हेच सांगणे रास्त ठरेल.
हे सुद्धा वाचा | तुमच्यासोबत डावपेच करणाऱ्यांना कसे ओळखावे?