मेंदूच्या आरोग्यासाठी कोणतं व्हिटॅमिन गरजेचं ?

1 November 2024

Created By : Manasi Mande

 मेंदू शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव, तो शरीराची सर्व कार्य सुरळीतपणे पार पडण्यासाठी मदत करतो. (Getty Images)

मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी 2 व्हिटॅमिन्स अत्यावश्यक असतात.

व्हिटॅमिन B12 मुळे समजण्याची कुवत वाढते. या व्हिटॅमिनमुळे सेरोटोनिन हार्मोनचा स्तर वाढतो, ज्यामुळे मूड सुधारतो.

व्हिटॅमिन B9 हे एकाग्रता वाढवतं, तसेच रक्तातील ऑक्सीजनची लेव्हल वाढवतं. त्यामुळे मेंदूला जास्त ऑक्सीजन पुरवठा होता आणि एनर्जी वाढते.

व्हिटॅमिन B12 आणि B9  हे दोन्ही शरीरात डीएनए आणि हेल्दी सेल्स बनवण्यात मदत करतं.

हे दोन्ही व्हिटॅमिन्स शरीरात रक्तपेशी तयार करतात आणि रक्ताची कमतरता अर्थात ॲनिमियापासून बचाव करतात.

या दोन्ही व्हिटॅमिन्समुळे होमोसिस्टीन नावाच्या अमीनो ॲसिडचा स्तर कमी होतो, त्यामुळे हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो.