कैरीचं  लोणचं कोणी खाऊ नये ?

11 December 2024

Created By : Manasi Mande

 नाश्ता असो की जेवणासोबत, डाव्या बाजूला वाढलेलं आंब्याचं लोणचं आवडीने खाल्लं जातं. बहुतांश लोकांना हे लोणचं आवडतंच.

पराठ्यांसोबत तर हे आंबट-तिखट लोणचं बेस्ट लागतं. पण हे लोणचं आरोग्यासाठी नुकसानदायकही ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का ?

न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांच्या सांगण्यानुसार, काही मेडिकल कंडीशन असणाऱ्यांनी हे लोणचं खाऊ नये, तेच उत्तम.

सतत गॅस, अपचन, पोटदुखी, छातीत जळजळ होणाऱ्यांनी कैरीचं लोणचं खाऊ नये.

लोणच्यामध्ये जास्त मीठ, तेल, मसाले असतात, त्यामुळे हाय-ब्लड प्रेशरच्या रुग्णांनीही त्याचं सेवन टाळावं.

जास्त लोणचं खाल्ल्यामुळे मेटाबॉलिज्म खराब होऊ शकते, यूरिक ॲसिडचा त्रास वाढू शकतो. त्यांनीही लोणचं खाऊ नये.

कोलेस्ट्रॉलचा त्रास असणाऱ्यांनाही लोणच्याचं सेवन टाळावं.