बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी आपल्या डाएटची खूप काळजी घेतात. पण असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी मांसाहार पूर्णपणे बंद करून ते शाकाहारी बनले

5 November 2024

यात पहिलं नाव आहे असा अभिनेता जो डाएटपासून ते वर्कआउटपर्यंत सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळतो तो म्हणजे अक्षय कुमार . खिलाडी कुमारने 2020 पासूनचं मांसाहार बंद केला आहे.

त्यानंतर अभिनेत्री सोनम कपूरनेही प्राणी प्रेमामुळे मांसाहारी पदार्थांचे सेवन करणे बंद केले आहे.

अभिनेत्री कंगना रणौतही मांसाहारी सोडून शाकाहारी बनली. 2013 पासूनच कंगनाने मांसाहार सोडला आहे.

लोकप्रिय क्रिकेटर विराट कोहलीनेही शाकाहारी होणं पसंत केलं आहे. 2018 पासूनच त्याने मांसाहार सोडला आहे.

अभिनेता आमिर खानही आता शाकाहारी आहे. किरण रावने त्याला एकदा एक व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर आमिरने मांसाहारी पदार्थ खाणं बंद केले.   

आलिया भट्टही 2020 पासूनच शाकाहारी बनली आहे.

अमिताभ बच्चन ही शाकाहारी आहेत.  त्यांना कोणीही मांसाहार सोडण्यास सांगितले नाही किंवा कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे त्यांनी तसे केले नाही. हे त्यांनी स्वत:हून निवडले असल्याचे ते सागंतात