11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानी सीमा हैदर उतरणार,
7 फेब्रुवारी 2024
Created By: Rakesh Thakur
सीमा हैदर गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेत आहे. अनधिकृतपणे भारतात घुसखोरी करूनही चांगलाच भाव मिळत आहे.
पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेली सीमा हैदर लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्याच्या स्टारडमचा फायदा घेण्याच्या विचारात राजकीय पक्ष आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी सीमा हैदरचं नाव चर्चेत असून निवडणुकीत आपलं नशिब आजमावू शकते. यासाठी कंबर कसली आहे.
उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभा निवडणुकीत सीमा हैदर दिसू शकते. राष्ट्रीय लोकदलसाठी प्रचाराची धुरा सांभाळू शकते.
राष्ट्रीय लोकदल नेत्यांनी नुकतीच या संदर्भात तिच्याशी चर्चा केली होती. आता तिच्याकडून हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे.
रालोदचे मथुरा उपाध्यक्ष कुंवर नरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, सीमा हैदरला लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी आमंत्रित केलं आहे.
सीमी हैदरनेही प्रचारासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. तसेच वृंदावन प्रेम मंदिर बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.